top of page

PULSE शक्ती विषयी...

neta.png

सद्यस्थिती 

महाराष्ट्रातील प्रत्येक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्याने आपल्या मतदारसंघातील सर्व महिला, पुरुष, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांना मोबाईलच्या माध्यमातून जोडले आहे. नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी व्हाट्सअप स्टेटस, ग्रुप्स आणि ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करून त्यांना सध्या वाढदिवस, जयंत्या, पुण्यतिथी किंवा अभिनंदनाचे संदेश पाठविले जातात. अशा संदेशांचा नागरिकांना काही एक फायदा होत नाही, कारण अशाच प्रकारचे संदेश इतर नेते - कार्यकर्त्यांद्वारे देखील पाठवले जातात. अशा,एसेज-इमेजेस पेक्षा नागरिकांना त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडेल, फायदा होईल, किंवा ज्ञानात भर पडेल असा कंटेंट पाहिजे आहे. नेते जयंत्या-पुण्यतिथ्यांचे भाकड संदेश देतील, ते नागरिकांना आवडतील व ते आपल्याला मतदान करतील, अशी स्थिती सध्या नाही. 

नागरिकांची ​गरज 

याच पार्श्वभूमीवर पल्स शक्ती उपक्रमाची संकल्पना मांडली आहे, ज्याद्वारे राजकीय व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन आपल्या मतदारसंघातील नागरिकांना LIVE दर्जेदार व उपयोगी कंटेंट पोहोचवतील. यात युवकांसाठी नोकरी, व्यवसाय व कौशल्यविकास संधी, महिलांसाठी गृहउद्योग, आरोग्य व कौशल्य योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व अध्यात्मिक मार्गदर्शन, शेतकऱ्यांसाठी पीक, फळबाग, सेंद्रिय शेती व पशुपालन यासंबंधी माहिती तसेच AI, आधुनिक तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा व भविष्यातील बदल याविषयी मार्गदर्शनपर लाईव्ह कार्यक्रम आयोजित केले जातील. नागरिकांना संवाद व सहभागाची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सशक्त आणि प्रगतिशील बनेल.

PULSE ची उद्दिष्टे

  • विविध पक्षांचे लोकनेते/जनप्रतिनिधी यांना एका व्यासपीठावर आणणे.

  • शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास, महिला सबलीकरण, रोजगार या क्षेत्रांत डिजिटल माध्यमांचा उपयोग करून ज्ञानवर्धन करणे, लोकांच्या उपयोगाची माहिती देणे, LIVE कार्यक्रमांद्वारे जनजागृती करणे. 

  • नागरिकांना  समाजपरिवर्तनात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देणे.

  • नागरिकांचे क्षमता वर्धन करणे.

  • नागरिकांना त्यांच्या हिताचा - फायद्याचा कंटेंट देणे. 

bottom of page